गडाखांच्या भूलथापेला पुन्हा बळी पडू नका.- माजी आमदार मुरकुटे
तालुक्यात विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी आव्हान नेवासा तालुक्यातील जनतेला भूलभुलैया करून आमदार गडाख यांनी जनतेला भूलथापाच दिल्या आहेत त्यामुळे भविष्यात अशा भूलथापेला जनतेने पुन्हा बळी पडू नये असे आव्हान भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्यातील पाथरवाला येथे मुंबादेवी सभामंडप लीकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलताना केले.
नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथे 25/15 ग्राम विकास निधी अंतर्गत मुंबादेवी मंदिराच्या सभामंडप लोकार्पण सोहळा आज माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी मुरकुटे यांनी आमदार शंकरराव गडाखांवर यांच्यावर जोरदार टीका करत मागील पाच वर्षाचा हिशोब जनतेला द्यावा. असे आव्हान मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्याचा कांगावा गडाखाकडून करण्यात येत आहे. आमदाराला विकास कामे करण्यासाठी तालुक्याला प्रत्येक वर्षी आलेलेला पाच कोटी रु.निधी कुठे खर्च केला असा सवाल बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.
तालुक्याला अडीच वर्षे मंत्रीपद मिळूनही गडाख यांनी मतदार संघासाठी काहीही केले नाही फक्त माणसे आडवा व त्यांची जिरवा हे धोरण राबवल्यामुळे तालुक्यात कोणी विरोधात बोलायला तयार नाही. त्यांचा कार्यकाळात शेतकऱ्यांची वीज तोडून पठाणी वसुली करणारे गडाख मागील साडेचार वर्षात गायब झाले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर जनतेचे कैवारी असल्याचे दाखवतात त्यामुळे नागरिकांनी अशा भूल भुलैय्यानां बळी पडू नये असे यावेळी म्हणाले. उस उत्पादक शेतकरी व कामगार यांची पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांची उसे न्यायची नाही पेमेंट वेळेवर द्यायचे नाही उसाचा भाव अन्य कारखान्यापेक्षा कमी द्यायचा कामगारांचे बारा ते पंधरा महिन्यांची पगार थकून ठेवलेले आहेत असे अनेक मुद्दे उपस्थित करून मुरकुटे यांनी गडाखांचा खरपूस समाचार घेतला.यावेळी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी डॉ.बाळासाहेब कोलते राजू शेख रितेश भंडारी, सुर्यकांत गुंड, निवृत्ती खाटिक शिवनाथ खाटिक, अमोल खाटिक, संभाजी खाटिक,भाऊराव खाटिक,सुदाम थोरे, यंकू फुलमाळी, बाळासाहेब फुलमाळी, भाना फुलमाळी रमेश खाटिक,आर आर खाटिक आदिनाथ थोरे सतीश मुथा सह ग्रामस्थ थोठ्या संख्यने उपस्तीत होते.