धनगर समाजाने या निवडणूकीत नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मागे उभे रहा – राजूमामा तागड यांचे आवाहन
धनगर समाजाने या निवडणूकीत नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मागे उभे रहा – राजूमामा तागड यांचे आवाहन
नेवासा (प्रतिनिधी) – धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी नेवासा फाटा येथे धनगर समाजाने राज्यव्यापी अमरण आंदोलन पुकारलेले होते या धनगर समाजाला पाठींबा देण्यासाठी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जाहीर पाठींबा देवून उपोषणाच्या दरम्यान तीन वेळेस भेटी दिलेल्या असतांना आमदार गडाख उपोषण स्थळांवरुन जाता – येतांना एकदाही भेट दिलेली नव्हती त्यामुळे आता धनगर समाजानेही याचा विचार करण्याची वेळ आलेली असून आपल्या समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या माजी आमदार मुरकुटे यांना या निवडणूकीत जाहीर पाठींबा द्यावा असे आवाहन धनगर समाजाचे नेते राजूमामा तागड यांनी केले आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मंञालय पातळीवरही आरक्षण लढ्याला मुरकुटे यांनी सततच मदत केलेली असून या लढ्याला वेळोवेळी त्यांनी पाठींबा दिलेला आहे त्यामुळे आता धनगर समाजाने याची जाणीव ठेवून मुरकुटे यांना मदत करावी असे आवाहन तागड यांनी करुन संकटात ज्यांनी आपल्याला मदत केली त्याची उतराई म्हणून माजी आमदार मुरकुटे यांना या निवडणूकीत मदत करण्याचे आवाहन करुन संपुर्ण धनगर समाज हा माजी आमदार मुरकुटे यांच्या पाठीशी निश्चीत उभा करु असेही यावेळी बोलतांना तागड यांनी सांगितले.