नेवासा तालुका महायुती कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा.
नेवासा फाटा येथे रविवारी सकाळी ९ वा.महायुतीतील कार्यकर्त्यांचा संवाद व विचार विनिमय मेळाव्याचे लक्ष्मी मंगल कार्यालय पावन गणपती समोर नेवासा येथे होणार असल्याची माहिती माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजपा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष यांनी माहिती दिली.
विधान सभेसाठी पडघम वाजू लागले असल्याने स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघात महायुती सरकारने घेतलेले धोरणे व निर्णय तसेच महायुतीचि पुढील रणनीती ठरवण्यासाठी रविवार दिनांक २७ अक्टोबर रोजी नेवासा फाटा लक्ष्मी मंगल कार्यालय येथे महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या (भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित दादा गट, आरपीआय आठवले गट, रयत क्रांती,जनता दल,बहुजन रिपब्लिक एकता मंच,जनसुराज्य पक्ष,लहूजी साळवे बहुजन क्रांती सेना,जय मल्हार क्रांती संघटना, जनता दल व इयर घटक पक्षांच्या सर्वं पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा होणार असून यासाठी तालुक्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संखेने उपस्तीत राहावे असे आव्हान भाजपचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी केले आहे.