मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याकडून उस उत्पादक शेतकऱ्यांची घोर फसवणूक माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आरोप…
ज्ञानेश्वर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले की जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी ३२०० रु प्रती टना पर्यंत भाव दिला. परंतु ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने मात्र २७०० रु. भाव देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पोसली आहेत व घोर फसवणूक केली आहे.
कार्यक्षेत्रामध्ये ऊस असून देखील त्याची तोड न करता बाहेरून ऊस आणत जात आहे व या उसाला २८०० ते ३००० रु. भाव दिला जात आहे मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना २७०० रु. भाव देवून शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक केली जात आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशाजन वातावरण आहे.
ज्ञानेश्वर व मुळा दोन्ही कारखाने कर्जबाजरी झालेले असून टाळेबंद मध्ये मात्र स्थावर मालमत्तेची किंमत वाढवून दाखवल्यामुळे कारखान्याची परिस्थिती कागदावर चांगली दिसते. कारखान्याच्या तिजोरीतून राजकीय निवडणुका शेतकऱ्यांच्या जीवावर केल्या जातात. आडमाप पैशांचा उधामाधा केल्यामुळेच शेतकऱ्यांच्या या कामधेनु संकटात टाकण्याचे काम आजपर्यंत केले जात आहे. व हे कारखाने त्यांनी कर्जबाजारी केले आहेत. जेव्हा शेतकऱ्यांना काही देण्याची वेळ येते तेव्हा मात्र साहेब, भाऊ म्हणून घेणाऱ्यांचे तोंड मात्र मूक गिळून गप्प बसत हि आश्चर्याची बाब आहे असा टोला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी लगावला. येणाऱ्या गळिताचा भाव कारखान्याने जाहीर न केल्याने तसेच मागील वर्षातील दिवाळी साठी शेतकऱ्यांना कुठलीही तरतूद न केल्याने मुरकुटे यांनी कारखाना व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त केला आहे.
कामगारांना वर्षभर पगार न देणे म्हणजे हा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्यायच आहे. कामगारांचे अश्या प्रकारे शोषण करणे म्हणजे स्वताचे घरे भरून कामगारांना वाऱ्यावर सोडणे दिवाळीला २० % बोनस देणे परंपरा असताना १३ % बोनस देऊन बोळवण करण्याचा प्रकार निंदनीय आहे.
कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे नियोजन केले जात नाही. कार्यक्षेत्राच्या बाहेरून उस आणून वाहतुकीचा खर्च आणि तोडणीचा खर्च कार्यक्षेत्रातील सभासदांवर लादल्यामुळे भावामध्ये त्याचा फटका बसत आहे. तोडणी व वाहतूक खर्च ६०० रु. होत असतानी ९०० रु. पर्यंत केला जातो उत्पादन खर्च १२०० ते. १५०० रु केल्यामुळे शेतकऱ्यांना हा फटका बसत आहे.
कारखान्याच्या लगतच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचा आज बाजार मांडला आहे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना आज या संस्थांमध्ये डोनेशन देऊन अँड मिशन घ्यावे लागते व डोनेशन देवून नोकरीला लागावे लागते.
येणाऱ्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकऱ्याना ३५०० रु. प्रती टन भाव देवून कारखाना कामगारांना २०% बोनस देऊन कामगारांना त्यांचे मागील वर्षभराचे थकीत पेमेंट देण्यात यावे व त्यांची दिवाळी गोड करण्यात यावी अन्यथा कारखान्याची दिवाळी गोड होवू देणार नाही असा इशारा मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याला मुरकुटे यांनी दिला.