मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याने ऊस भावाचा खुलासा करावा…माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
सन २०२४/२५ च्या गळीत हंगामाचा बॉयलर पेटवण्याप्रसंगी ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने ऊस भावा संदर्भात सविस्तर खुलासा करणे हे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. यावर्षी शेतकऱ्यांना राज्यात भाव्सार्वाधिक भाव मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याकडून मिळावा हे अपेक्षित आहे. मात्र तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर साखर कारखान्याने टोलवा टोलवी करत या हंगामाचे दर निश्चित केले नाही त्यामुळे या दोन्ही कारखान्याने येणाऱ्या हंगामासाठी दर जाहीर करावे अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.
ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने एफआरपी प्रमाणे पेमेंट देवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरे व तिसरे पेमेंट दिले पाहिजे. अन्यथा शेतकरी आपला ऊस जो कारखाना जास्त भाव देईल त्याला आपला ऊस देणार आहेत. कारखान्याने मागील वर्षी राज्याच्या तुलनेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पाचशे ते हजार रु. प्रती टन कमी भाव देऊन उस उत्पादक शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय केलेला आहे. शेतकऱ्यांनी काय म्हणून पाचशे ते हजार रु. प्रती टन कमी घ्यायचे? ज्ञानेश्वर व मुळा कारखाना सरळ सरळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. जिल्ह्यामध्ये इतर सर्व कारखाने ३२०० रु. ते ३५०० रु. भाव देत असताना, आपण देत असलेला 2700 रु एवढा कमी भाव हा आम्हाला कोणत्याच शेतकऱ्याला मान्य नाही. शेतकऱ्यांची हि फसवणूक कारखान्यांना महाग पडणार आहे. हे कारखाने उस उत्पादन खर्च दोन हजार ते अडीच हजार रुपये दाखवून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. साखरेची किमत, इथेनॉल ची किंमत, को जनरेशन ची किमत, व बी हेवी मॉलिशेस मधील अल्कोहल ची किमत या सर्वांचीच बेरीज केले तर हे कारखाने आजच्या घडीला ४००० रु प्रती टन भाव देवू शकतात. परंतु मागील वर्षी केलेली फसवणूक व यावर्षी जर भाव जाहीर केला नाही तर शेतकर आपला उस जो भाव जास्त देईल त्या कारखान्यांना देणार आहेत.
मुळा व ज्ञानेश्वर कारखाने निवडणुकीच्या तोंडावरती शेतकरी व कामगारांवर्ती करत असलेला अन्याय हा त्यांना महाग पडणार आहे. जर बॉयलर पेटवण्याच्या कार्यक्रमात भाव जाहीर करा. शेतकऱ्यांना न्याय देऊन जास्तीत जास्त भाव जाहीर करा. जर आपण भाव जाहीर केला नाही तर मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला आम्ही विरोध करणार आहोत. व भाव जाहीर केल्या शिवाय आम्ही मोळी टाकू देणार नाहीत.