2023-24 च्या महायुती सरकारच्या कार्यकाळात वैयक्तीक लाभाच्या योजनेचा तालुक्यातील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा – आ.बाळासाहेब मुरकुटे
भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारमध्ये अनेक लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. महायुती सरकार हे जनसामान्य कष्टकरी शेतकरी व कामगारांचे कल्याण करणारे सरकार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना नवीन लाभ देण्यात आला आहे .श्रावण बाळ योजना , इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना , तालुक्यातील संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असेल तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेमध्ये पात्र झालेल्या डोल 1291ना आर्थिक लाभ मिळणार आहे.
शिधापत्रिका 2610 मंजुरी व वितरण करण्यात आले. तरी त्यांना या महिन्या पासून धान्य मिळण्यास सुरवात होणार आहे. घरकुल मंजुरी, मोदी आवास योजना मजुर,पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना एकूण मंजूर 2325 शासनाच्या मूलभूत योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून तालुक्यामध्ये सरकारच्या कार्यकाळामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना फायदा झाल्याचं सांगितले. तरी भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका व माहिती च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण जी विखे पाटील साहेब,भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी आदींचे तालुक्यातील लाभार्थींनी अभिनंदन केले आहे.